Sunday , September 20 2026
Breaking News

“हर हर महादेव”च्या गजरात शहापूर श्री बसवाण्णा यात्रा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथील बसवाण्णा देवस्थान यात्रेच्या आज मुख्य दिवशी मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्यांचा पार पडला. हर हर महादेव गजराने संपूर्ण देवस्थान परिसर दुमदुमून गेला होता. बेळगावसह परिसरातील भाविक इंगळ्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल सोमवारी शहापूर परिसरातील प्रमुख गल्या मधून आंबील गाडे काढण्यात आले. बैलजोड्या, गाडे, मर्दानी खेळ अशी भव्य मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत काढण्यात आली होती. आज सकाळी बसवांण्णा देवाला अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी जेड गल्ली, कोरे गल्ली, दाणे गल्ली, सराफ गल्ली यासह प्रमुख मार्गावर पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी इंगळ्यांचा कार्यक्रम झाला.

शहापूर पंच कमिटी व बसवाण्णा मंदिराचे पुजारी यांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पाळणे फेडणारा इंगळ्यांचा सोहळा पार पडला. विधिवत पूजनानंतर प्रदक्षिणा होताच हर हर महादेव गजरात बसवाण्णा देवाचा जयघोष करत निखार्‍यांमधून भाविक धावले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *