Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

“संगीत मानापमान” चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सुबोध भावे यांची बेळगावात उपस्थिती; प्रेक्षकांशी साधला संवाद…

  बेळगाव : बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मानापमान या चित्रपटाच्या विशेष शो ला अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी उपस्थिती दर्शवून प्रेक्षकांशी संवाद साधला. बेळगावच्या जनतेने संगीत मानापमान चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेते सुबोध भावे यांनी आभार मानले. यावेळी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांशी सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांनी …

Read More »

कै. डॉ. अशोक सखदेव यांना बेळगावातील कलाकारांच्यातर्फे रविवारी “स्वर श्रध्दांजली”

    बेळगाव : बेळगावातील विविध संगीत संस्थांशी संबंधित असलेले संगीत प्रेमी डॉक्टर अशोक सखदेव यांना बेळगावातील कलाकारांच्यातर्फे स्वर श्रध्दांजली कार्यक्रमाच्याद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पंडित रामभाऊ विजापूरे स्वर मंदिर, बुधवार पेठ, टिळकवाडी येथे सदर स्वर श्रध्दांजली कार्यक्रम होणार …

Read More »

नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने काॅ. कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली

    येळ्ळूर : सीमासत्याग्रही काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे नुकतेच निधन झाले. नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली. सदर शोकसभेच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी सायनेकर होते. प्रारंभी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. सेक्रेटरी आनंद पाटील यांनी काॅ. कृष्णा मेणसे यांच्या कार्याचा आढावा घेतला. नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी, …

Read More »

क्रांतिकारी विचारांचा लोकनेता हरपला; विविध संघटनांतर्फे कॉ. कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली

  बेळगाव : स्वातंत्र्यलढा, सीमालढा, गोवा स्वातंत्र्यमुक्ती लढ्यातील झुंजार सेनानी, दलित, श्रमिक, कामकरी, कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता, साहित्यिक, पत्रकार, कुस्तीपटू, खेळाडू असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून कॉ. कृष्णा मेणसे यांचे कार्य अतुलनीय स्वरुपाचे होते. त्यांच्या निधनाने क्रांतिकारी विचारांचा लोकनेता हरपला असून आप्पांच्या विचारांची जोपासना करणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात …

Read More »

हुतात्म्यांना विनम्र अभिवादन; म. ए. समितीचे आवाहन

  बेळगाव : आज शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अभिवादन कार्यक्रमानंतर ठीक 11.00 वाजता कोल्हापूरला जाणेसाठी बर्डे पेट्रोल पंप कोल्हापूर हायवेवर …

Read More »

आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे सुयश; अद्वैत जोशीला वैयक्तिक चॅम्पियनशिप

  बेळगाव : बेळगाव येथील जे एन एम सी सुवर्ण आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात स्विमर्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकासह रनर्सअप चॅम्पियनशिप मिळविली तर अद्वैत जोशी याने ग्रुप पाच मध्ये सात पदके संपादन करून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली. या स्पर्धेत विविध …

Read More »

बिदरमध्ये सशस्त्र दरोडेखोरांकडून दोन सुरक्षा रक्षकांची हत्या

  एटीएमसाठी आणलेली ९३ लाखांची रोकडही लुटली बंगळूर : बिदरच्या जिल्हा मुख्यालयातील एसबीआय एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली ९३ लाखांची रोकड पळवण्यापूर्वी दुचाकीवरून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी दोन सुरक्षा रक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा एजन्सीचे तीन कर्मचारी एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी सकाळी …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; म. ए. युवा समिती बैठकीत आवाहन

    बेळगाव : आज बुधवार दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक बोलवण्यात आली होती, बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर होते. बैठकीच्या प्रारंभी कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच हुतात्मा चौकात, बेळगाव येथे १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य …

Read More »

म. ए. समिती शिष्टमंडळाने कोल्हापूर धरणे आंदोलनासंदर्भात कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना निवेदन

  बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला सीमाप्रश्नी जागे करण्यासाठी आणि सीमाप्रश्न चालना मिळविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी सक्रीय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने विविध नेते मंडळींची भेट …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२४’ करिता मराठी विभागासाठी श्री. संजय अण्णासो सुर्यवंशी, वृत्त संपादक दैनिक पुढारी, बेळगाव व कन्नड विभागासाठी श्री. चंद्रकांत सुगंधी, जिल्हा प्रतिनिधी न्यूज १८ चॅनेल, बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ‘प्रा. एस. आर. जोग महिला …

Read More »