Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक छळ; इदलहोंड येथील प्रकार

खानापूर : एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने सदर महिलेवर व तिच्या पतीवर आज अचानक वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवून महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इदलहोंड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

  कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला. या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …

Read More »

भाजप उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळातर्फे बेळगावात आंदोलन…

  बेळगाव : महागाईसह अन्य समस्यांवरून राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत बेळगाव भाजपच्या उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळतर्फे शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकात भाजपचे विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन सरकारविरोधात घोषणा देत निषेध फलक दाखवले. यावेळी बोलताना महापालिकेच्या भाजप अध्यक्ष गीता सुतार …

Read More »

६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

  बेळगाव : मराठा मंदिर येथे रविवारी संपन्न होत असलेल्या सहाव्याअखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगरी सज्ज झाली आहे. ग्रंथ दिंडीला खाऊ कट्यापासून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून मराठा मंदिर मध्ये सकाळी दहा वाजता हे संमेलन सुरू होईल. यंदाचे बेळगाबात …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक अहवालावर लोकसभेत चर्चा करावी : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने निर्णायक पावले उचलून लोकसभेत भाषिक अल्पसंख्याक अहवालावर चर्चा करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने समन्वयक मंत्री, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात सीमाभागातील सध्याची गंभीर परिस्थिती मांडण्यात आली आहे. या पत्रात सीमाभागात मराठी भाषेचा अभिमान …

Read More »

गाडीकोप खून प्रकरणी नवी कलाटणी; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा!

खानापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बलोगा गावात घडलेल्या खून प्रकरणी वेगळीच कलाटणी मिळाली असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलोगा गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी २४ तासात पोलिसांनी आरोपीला …

Read More »

हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व …

Read More »

पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटविले….

  बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट जवळील बॅरिकेड्स प्रायोगिक तत्त्वावर हटविण्यात आले आहेत. टिळकवाडी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून याबाबत पावले उचलावीत अशी मागणी येथील काही नागरिकांनी सातत्याने लावून धरली होती. या मागणीचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. याप्रमाणे नजीकच्या काळात दुसरे रेल्वे गेटवर …

Read More »

गणेशपूर येथे क्षुल्लक कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला

  बेळगाव : गणेशपूर येथे क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. प्रवीण पादके नामक व्यक्ती आज सकाळी गणेशपूर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका बेकरीतून ब्रेड आणण्यासाठी गेला होती. यावेळी बेकरीशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पार्किंगच्या …

Read More »

बस-कार अपघात : बेळगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू

  दावणगेरे : दावणगेरे येथे बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसवराजप्पा (38), श्रीधर (32), विजय …

Read More »