Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरणाऱ्या मिशन ऑलंपिक संघटनेविषयी

  बेळगाव : ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक’ यांच्या वतीने बेळगाव येथे भव्य ‘मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ, बेळगाव येथे होणार आहे. विविध खेळांतील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन …

Read More »

एमएलआयआरसीतर्फे ‘इन्फंट्री डे’ निमित्त ‘शौर्यवीर रन’चे आयोजन

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) यांनी ‘शौर्यवीर रन २०२५’ या भव्य सामुदायिक धावण्याच्या स्पर्धेची घोषणा केली आहे. भारतीय लष्कराच्या ७९ व्या पायदळ दिन निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा केवळ एक रन नसून, भारतीय पायदळाच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला दिलेली ही मनस्वी मानवंदना आहे. …

Read More »

कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व : सौ. शकुंतला बिरजे

  माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय.. ——————– सौ. शकुंतला अनिल बिरजे हिचा जन्म १९५४ मध्ये गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पार्वती व शंकरराव ईराप्पा पाटील यांच्या पोटी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक …

Read More »

एच. के. पाटील यांचे महाजन अहवालाचे तुणतुणे कायम; म्हणे सीमाप्रश्न संपला!

  बेळगाव : कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत सीमा प्रश्न संपल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक नोव्हेंबर राज्योत्सव दिन हा केवळ भाषिक नव्हे तर कर्नाटक राज्याचा गौरवशाली उत्सव आहे. कन्नड संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी सरकार सर्वतोपरी …

Read More »

बेळगावला “दुसरी राजधानी” घोषित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

  बेळगाव : बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने ही मागणी उचलून धरली असून लवकरात लवकर सुवर्णसौधच्या शेजारी प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात यावा अन्यथा एक नोव्हेंबर रोजी थेट धरणे आंदोलन करण्याचा इशारा उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने सरकारला …

Read More »

वसुबारस निमित्त निपाणीसह ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातर्फे गोपूजन

    निपाणी (वार्ता) : वसुबारसने दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातर्फे गोमातेची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.या सणासाठी लागणाऱ्या आकर्षक नक्षीदार पणत्या, विविध प्रकारच्या रंगीत रांगोळ्या, आकाश कंदील, सुवासिक तेल, अगरबती, मेणबती, कापूर, धुपासह अन्य साहित्य खरेदीसाठी निपाणी बाजारात ग्राहकांची …

Read More »

खासदार जगदीश शेट्टरांनी मराठी भाषिकांवर ओकली गरळ!

  बेळगाव : एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन असल्याने या दिवशी कोणीही काळा दिन आचरणात आणू नये तर कर्नाटक राज्यातील सर्वांनीच एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा करावा अशी गरळ ओकली. मराठी भाषिकांच्या मतांवरच निवडून येऊन खासदारकी भूषवणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर यांनी आपला मराठी द्वेष्ट्येपणा दाखवून दिला आहे. सीमाभागातील …

Read More »

श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे निपाणी तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि त्यासाठी धारातीर्थ पडलेले मावळे, गडकोट, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अजरामर रहावा, त्याची माहिती युवा पिढीला मिळावी, त्या उद्देशाने ‌ येथील श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे सलग ७ व्या वर्षी तालुका स्तरीय दुर्गबांधणी (किल्ला) स्पर्धेचे …

Read More »

शुभम शेळके यांच्यावर पुन्हा पोलिसांची वक्रदृष्टी!

  बेळगाव : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत माळ मारुती पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी शुभम शेळके यांचा मोबाईल आणि कार जप्त केली होती. जप्त केलेला मोबाईल आणि कार परत आणण्यासाठी शुभम शेळके आज माळ मारुती …

Read More »

1 नोव्हेंबर 2024 काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 45 …

Read More »