Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे १ मे कामगार दिनाचे निमित्त साधून वॉर्ड क्रमांक २८ मधील महानगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर श्री. संजय शिंदे आणि लक्ष्मीरोड येथील ज्येष्ठ पांच काशिनाथ कडते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वच्छ्ता कर्मचारी वॉर्डासोबतच बेळगाव स्वच्छ ठेवून …

Read More »

शेख होमिओपॅथिक कॉलेजचे यश

  बेळगाव : ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस कर्नाटक बेंगळुरूतर्फे घेण्यात आलेल्या एमडी द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक डॉ. कीर्ती शिवाजी हुद्दार (बिर्जे), द्वितीय डॉ. जेनिस्का दा सिल्वा, तृतीय डॉ. नुती अग्रवाल यांनी मिळविला. …

Read More »

चर्मकार समाजाच्या श्री सोन्या मारुती देवस्थानाचा जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा भक्तीभावात

  बेळगाव : शहापूर येथील चर्मकार समाजाच्या दीडशे वर्षाहून अधिक पुरातन असलेल्या श्री सोन्या मारुती देवस्थानाचा जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या भक्तीभावात पार पडला. श्री मनोरंजन प्रणव स्वरुपी निजलिंग स्वामींजी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. …

Read More »

बसवण्णाच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बसवण्णा हे एक महान पुरुष होते ज्यांनी जात, रंग आणि वर्ग भेद दूर करून समान समाज निर्माण केला. बसवण्णाच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त …

Read More »

पूर नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा व तालुकास्तरावरील विभागांचा आढावा कोल्हापूर : येणाऱ्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, …

Read More »

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : जातनिहाय जनगणना करणार

  नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरच मोदी सरकारने स्ट्राइक केला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी या मागणीवरून केंद्र सरकारला अनेकदा घेरले होते. तर इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : पारंपरिक वेशभूषेत नटलेले शिवभक्त… ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी मुख्य रथावर असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मूर्ती… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात छत्रपती शिवाजी उद्यान येथे सकाळी सहा वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवछत्रपतींना प्रेरणा मंत्र म्हणून विधीपूर्वक पूजनाने सुरवात करण्यात आली. महाराजांच्या मूर्तीला …

Read More »

बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव, मराठी विद्यानिकेतन बेळगाव व ओऊळकर कुटुंबीय यांच्या वतीने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन गटात चित्रकला स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते. बहिर्जी ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ओऊळकर कुटुंबीयांच्या वतीने गेली बारा वर्षे या चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी या स्पर्धा नुकत्याच …

Read More »

शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी काम करा!

  आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांची अधिकाऱ्यांना सूचना : महापालिका आरोग्य स्थायी समितीची बैठक बेळगाव : बाजारपेठेसह महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तेव्हा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे अशी सूचना महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे …

Read More »

ग्राम प्रशासकांनी केंद्रस्थानी राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; ग्राम सहाय्यकांना नियुक्ती पत्रे, लॅपटॉपचे वितरण बंगळूर : ग्राम प्रशासकांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील पंचायतीच्या मुख्यालयात राहून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. नवनियुक्त एक हजार ग्राम प्रशासन अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ९,८३४ मंजूर ग्राम प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदांसाठी लॅपटॉप देण्याचा …

Read More »