चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता …
Read More »भाजप, संघाचा सामाजिक न्यायावर विश्वास नाही : सिद्धरामय्या
बंगळूर : भाजप आणि आरएसएस सामाजिक न्यायावर विश्वास ठेवत नाहीत. ते यासाठी वचनबद्धही नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटण तालुक्यातील तुबिनाकेरे हेलिपॅडवर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जर आपण शंभर वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर त्यांनी नेहमीच सामाजिक न्यायाला विरोध केला आहे. मिलर कमिशनपासून ते आजतागायत नलवाडी …
Read More »राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील संत मीरा शाळेत प्रथम
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी संतोष पाटील हिने 2025 मधील दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 619 गुण 99.4% टक्के घेत शहरात अव्वल क्रमांक पटकाविला आहे तर शाळेत प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. विद्या कैलास पिटुले हिने 625 पैकी 613 …
Read More »बेळगावात अवतरली अवघी शिवसृष्टी!!
बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन पोलिस आयुक्त याडा मार्टिन व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे खजिनदार प्रकाश …
Read More »सेंट जोसेफची निधी कंग्राळकर जिल्ह्यात दुसरा
बेळगाव : एसएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 625 पैकी 624 गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बैलहोंगल रूपा पाटील हिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात, आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बेळगाव अनगोळ येथे …
Read More »एसएसएलसी निकाल जाहीर : निकाल ६६.१ टक्के; २२ विद्यार्थी राज्यात टॉपर!
९१.१२ टक्के निकालासह दक्षिण कन्नड राज्यात प्रथम बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल आज जाहीर झाला, ज्यामध्ये एकूण ६६.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दक्षिण कन्नड जिल्हा ९१.१२ टक्के निकालासह राज्यात प्रथम स्थानावर असून गुलबर्गा जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ४२.४३ टक्के लागला आहे. शालेय शिक्षण आणि …
Read More »एसएसएलसी परीक्षेच्या निकालात बैलहोंगलची रूपा चनगौडा पाटील राज्यात अव्वल
बेळगाव : कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलच्या रूपा चनगौडा पाटील या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलाहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थीनी रूपा पाटील हिने ६२५ गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
Read More »प्यास फाउंडेशनच्या वतीने विकसित तलाव ग्रामपंचायतीकडे सोपवला
बेळगाव : प्यास फाउंडेशनने विकसित केलेला तलाव ग्रामपंचायतीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. जलसंधारणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जलस्त्रोत विकास करणाऱ्या प्यास फाउंडेशनने एक तलाव विकसित करून तो ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केला. यावेळी …
Read More »दहावीचा निकाल आज जाहीर होणार
बेळगाव : दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि. 2 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय परीक्षा- मूल्यमापन मंडळाने दिली आहे. 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सार्वत्रिक सुट्टी असल्याने 2 मे रोजी निकाल जाहीर …
Read More »राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होवूया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, सर्किट बेंच, विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta