Monday , September 21 2026
Breaking News

निपाणीत आंतरराज्य बैलगाडी शर्यतींची तयारी पूर्णत्वाकडे

Spread the love

 

टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांची माहिती ; गुरुवारी शर्यतींचा थरार

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलत मळ्यातील कृषीधन दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (१ जानेवारी) विनालाठी-काठी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीसह विविध शर्यतीचे आयोजन केले आहे. हालसिध्दनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) येथे होणाऱ्या या शर्यतीसाठी अनुक्रमे होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर प्लस व एचएफ डिलक्स् अशी पहिली तीन बक्षिसे आहेत, अशी माहिती निपाणी टाऊन प्लॅनिंग समितीचे अध्यक्ष निकू पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, स्थापनेपासूनच संस्थेने सामाजिक बांधिलकीतून दरसाल वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले आहेत. युवकांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यंदा वर्धापन दिनी १ जानेवारी रोजी शर्यत आयोजित केली आहे. पहिल्या तीन क्रमांकासाठी दुचाकी बक्षीस ठेवण्यात आले आहे. लोकाग्रहास्तव जनरल घोडा-बैल शर्यत आयोजित केली आहे. त्यासाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ७ हजार रुपये, जनरल घोडागाडी शर्यतीसाठीअनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार, आदत घोडा-बैल शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
इच्छुकांनी डॉ. सचिन काटकर, तात्यासो वालीकर, प्रदीप इंगवले, स्वप्नील पावले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, उपाध्यक्ष डॉ. सचिन काटकर, तात्यासाहेब वालीकर, रणजित मगदूम, शैलेश मल्लाडे, महादेव मल्लाडे, राजू पाटील, रमेश भोईटे, नितीन उपाळे, सागर पाटील, सुभाष शिंदे, स्वप्नील पावले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *