Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात आणखी एका विद्यार्थीनीची आत्महत्या…

  बेळगाव : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे. शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने …

Read More »

फी वाढीबद्दलचा निर्णय मागे घेण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांची विनंती

  बेळगाव : शहरातील वनिता विद्यालय शाळेतील शैक्षणिक वर्षात भरमसाठ फी वाढ झाल्याबद्दल पालकांनी शाळेच्या गेट समोर निदर्शने केली होती. याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका जोसेफिन-गुंती यांना भेटून फी वाढ तात्काळ मागे घेण्याबद्दल निवेदन …

Read More »

चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल; लाखो भाविकांची मांदियाळी

    कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहान भूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शनिवारी पार …

Read More »

धामणे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर अज्ञात महिलेकडून जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने पळविले

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे गावात शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर दुसऱ्या एका अज्ञात महिलेने जीवघेणा हल्ला करून तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६० वर्षीय विमलाबाई बाळेकुंद्री या महिलेवर अज्ञात …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा देवीस सुवर्णलेपित साडी अर्पण

  बेळगाव : सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीस तब्बल ७० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता करत वीरगोट्ट येथील अडविलिंग स्वामीजींनी ४.५ लाख रुपये किमतीची सुवर्णलेपित साडी देवीच्या चरणी अर्पण केली आहे. ही साडी अर्पण करण्यामागे तब्बल ७० वर्षांपूर्वीचा एक धार्मिक संकल्प होता. जंबगी येथील प्रभुदेव डोंगरावर वसलेल्या शिवयोगीश्वरांच्या प्रेरणेने हा …

Read More »

शिवसेनेच्या वतीने बडस येथे मोफत आरोग्य शिबीर

  बेळगाव : हिंदूहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लोक कल्याण मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर बेळगावसह खानापूर मधील जवळपास सत्तरहून अधिक गावात राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील आरोग्य शिबिराची सांगता आज इनाम बडस ता. बेळगाव …

Read More »

श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  खानापूर : कारलगा पंचक्रोशीतील श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळ हे गेले सहा दशकावून अधिक काळ भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषा कला व संस्कृतीचे जतन करीत आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्य आजतागायत निरंतर चालू आहे. खानापूर तालुक्यात खेडोपाडी भजनी भारुडाचे सादरीकरण करत समाज प्रबोधनाचे काम या भजनी …

Read More »

निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचतर्फे निरंतर पुस्तक वाचनाने महापुरुषांना अभिवादन

  निपाणी (वार्ता) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक महापुरुषांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. त्यामुळे समाजाला वैचारिक वारसा देण्याचा प्रयत्न झाला‌. शिवाय प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची क्षमता महापुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये होती. ही कार्यक्षमता केवळ महापुरुषांनी वाचन क्षमतेच्या जोरावरती केली. त्यामुळे येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे शुक्रवारी (ता. ११) येथील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे ग्रंथालय व प्रयोगशाळा नुतनीकरणाचे उद्घाटन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रशस्त ग्रंथालय व प्रयोगशाळेच्या नुतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.. महात्मा फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.राजाभाऊ पाटील, प्रमुख पाहुणे श्री.जयंत नार्वेकर, श्री. सुभाष ओऊळकर, डॉ.पी.डी. काळे, …

Read More »

४० टक्के कमिशन आरोप; चौकशीसाठी एसआयटी स्थापन्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  बंगळूर : राज्यातील मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप होता. या आरोपावर न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे अधिक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना कायदा …

Read More »