Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात बीम्स हॉस्पिटलतर्फे मतदान जनजागृती जथा

  बेळगाव : बेळगावातील बीम्स हॉस्पिटल आणि बीम्स संस्थेतर्फे आज शहरात मतदान जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक मत ही देशाच्या विकासाची नांदी आहे. मतदान ही लोकशाहीत संधी आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतमतदानापासून वंचित राहू नये यासाठी बेळगाव बीम्स हॉस्पिटलच्या वतीने जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश …

Read More »

घरगुती वापरासाठीच्या विज दरात प्रति युनिट १.१० रुपये कपात

  आजपासून प्रभावी; १५ वर्षात प्रथमच वीज दरात कपात बंगळूर : राज्यात पंधरा वर्षांनंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आली आहे. दर कपात आजपासून लागू होणार असून मे महिन्यात देण्यात येणाऱ्या बिलाना ती लागू होणार आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वार्षिक कार्यवाही केली आणि …

Read More »

दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

  दुचाकीस्वारांच्या घिरट्या : महिलांच्यात घबराहाट कोगनोळी : मागील काही दिवसांपासून कोगनोळी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोऱ्यांचे प्रकार भामट्या दुचाकीस्वारांकडून पुन्हा सुरू झाले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी तालुका निपाणी येथील …

Read More »

बाची चेकपोस्टवर ६.६५ लाख रुपये जप्त

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमा चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील बाची चेकपोस्टवर कागदपत्रांशिवाय वाहतूक होत असलेले ६.६५ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी अमूल विद्याधर यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. निवडणूक …

Read More »

राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, मुंबईला ६ गड्यांनी नमवले

  मुंबई : आयपीएल २०२४ मधील १४वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला. ज्यामध्ये राजस्थानने मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव करत सलग तिसरा विजय नोदंवला. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला १२६ धावांचे लक्ष्य दिले होते, …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा पट्टा पडला!

  गाळप आणि साखर उत्पादनात जवाहर कारखाना आघाडीवर कोगनोळी : नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. जिल्ह्यातील अथर्व इंटर ट्रेड, हमिदवाडा सदाशिवराव मंडलिक, गडहिंग्लज, बांबवडे, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या सात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली …

Read More »

लाल- पिवळ्या ध्वजाला प्रशासनाचे “अभय”!

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले जाहिराती फलक, भगव्या पताका, भगवे ध्वज त्याचप्रमाणे इतर जाती-धर्मांचे ध्वज काढण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करत असताना प्रशासनाने मात्र लाल पिवळ्या ध्वजाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे लाल-पिवळ्या ध्वजाला आचारसंहितेची नियमावली लागू पडत नाहीत की …

Read More »

बेळगाव लोकसभेसाठी समिती देणार उमेदवार! ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेला एक उमेदवार देण्यावर ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत रोज दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येतील ही …

Read More »

बेळगावात जेएमएफसी न्यायालयासमोर करणीबाधा

  बेळगाव : चक्क न्यायदेवतेच्या मंदिरासमोरच अंधश्रद्धेतून करणीबाधेचे साहित्य ठेवल्याचा खळबळजनक प्रकार आज बेळगावात उघडकीस आला. बेळगावातील चन्नम्मा चौकाजवळील नव्या जेएमएफसी न्यायालय कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुलालाने माखलेला नारळ, लाल-काळे पाणी भरलेले प्लास्टिक ग्लास, तांदूळ, काळ्या बाहुल्या, लिंबू असे चित्रविचित्र साहित्य एका पत्रावळीत भरून अज्ञातांनी ठेवून दिल्याचे आज सकाळी उघडकीस आले. …

Read More »

ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मशिदीच्या पक्षकारांना झटका

  वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. व्यासांच्या तळघरात पूजा सुरु राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तळघरात पूजा सुरु ठेवण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीसही पाठवली आहे. कोर्टाने सद्य स्थितीबाबत आदेश देताना मशिदीची गुगल अर्थ …

Read More »