बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळा बेळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत पाच दिवसाचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी विद्यानिकेतनच्या जागृती केंद्रात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून प्रा. सुरेश पाटील, उपाध्यक्ष, शाळा सुधारणा समिती हे उपस्थित …
Read More »नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी “श्री दुर्गामाता दौड”ला जल्लोषात सुरुवात
बेळगाव : आज देशभरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती. आज पहिल्या दिवशी देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची जनजागृती करून श्री दुर्गामाता दौड यशस्वीरीत्या संपन्न झाली. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात १० दिवस देवीचा जागर केला जातो. याचदरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. …
Read More »सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे एल.के.जी., यु.के.जी. वर्गाचे उद्घाटन
बेळगाव : आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे शासनाच्या आदेशानुसार एल.के.जी. आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या आणि लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि गांधीजींचे भजन गाऊन करण्यात आली. त्यानंतर एल.के.जी. वर्ग खोलीचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा …
Read More »जिल्हा प्रशासनातर्फे वीर सौधमध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वरांजली भजन कार्यक्रम
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, वार्ता विभाग तसेच बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सौध येथे आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात संगीत शिक्षक विनायक मोरे, अक्षता मोरे आणि सहकारी यांच्या स्वरांजली भजन संगीताने कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांनी वैष्णव …
Read More »विद्यार्थ्यांनी गांधी, शास्त्रींचा आदर्श घ्यावा : महांतेश कवटगीमठ
बागेवाडी महाविद्यालयात जयंती निपाणी (वार्ता) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांनी आदर्श जीवन जगले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे प्रतिमा पूजन करून चालणार नाही. त्यांनी जे सत्य अहिंसा आणि प्रामाणिकपणा चांगले कार्य आपल्यापर्यंत पोहोचविले. ते आपण पाळले पाहिजे, त्याचा स्वीकार करून त्यांचे आदर्श जीवन आपल्या …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या मुलींच्या खो-खो संघाला जिल्हापातळीवर विजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आंबेवाडी बेळगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या मुलींच्या संघाचा सहभाग होता. पहिल्या फेरीत सौंदत्ती विरुद्ध सामन्यात एकतर्फी विजय मिळवला त्यानंतर उपांत्य फेरीत खानापूर विरुद्ध 10-6 अशा गुणांनी विजय पटकावत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामना …
Read More »दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक; ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी जप्त
अथणी : अथणी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमूल जितेंद्र पवार (रा. सिंधुर ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र), लखन सुंगारे (रा. मदबावी, ता. अथणी, जि. …
Read More »खवले मांजराची तस्करी ; दोघांना अटक
खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोंढा वनक्षेत्रातील मोहिमेत खवले मांजराची तस्करी करून चीनला निर्यात करण्यात येत असताना दोघांना लोंढा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. खवले मांजराची निर्यात सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळॆ लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून सतर्क राहून पाळत ठेवली होती. खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता …
Read More »विश्व विख्यात दसरा महोत्सवासाठी म्हैसूर शहर सज्ज
आज होणार उद्घाटन; देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल बंगळूर : म्हैसूर पॅलेस (राजवाडा) दहा दिवसांच्या जगप्रसिद्ध दसरा उत्सवासाठी सज्ज झाला आहे. पारंपारिक दसरा किंवा नवरात्रीच्या उत्सवासाठी विद्युत रोशणाईने नव वधूप्रमाणे नटलेल्या म्हैसूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची लगबग सुरू झाली आहे. या भव्य-दिव्य सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक …
Read More »म. गांधी विचार गौरव पुरस्काराने कॉ. कृष्णा मेणसे सन्मानीत
दिमाखदार सोहळ्यात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : गांधी विचार व कम्युनिस्ट विचार हे दोन टोकाचे विचारप्रवाह आहेत. असे असताना कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ही माझ्या दृष्टीने वेगळी घटना आहे, असे उद्गार कॉ. संपत देसाई यांनी पुरस्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta