Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन शाळेत राष्ट्र सेवादल शिबिराचा उद्घाटन समारंभ

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळा बेळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत पाच दिवसाचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी विद्यानिकेतनच्या जागृती केंद्रात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून प्रा. सुरेश पाटील, उपाध्यक्ष, शाळा सुधारणा समिती हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रसेवादल व तिरंगा ध्वज फडकवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. सुरेश पाटील यांनी इयत्ता आठवीच्या शिबिरार्थींना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्वावलंब, स्वयंशिस्त यांचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते सदाशिव मगदूम – मिरज, बाबासाहेब नदाफ – सांगली, दामोदर – कोल्हापूर, विनायक, शाहिस्ता हे सर्व राष्ट्रसेवा दल सैनिक, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षण संयोजक नीला आपटे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत धामणेकर यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली हळदणकर व शबाना मुजावर यांनी आभार मानले.
या शिबिराची सांगता शुक्रवार दिनांक 4 /10 /2024 रोजी सायं 4:00 ते 6:00 या वेळेत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, मुंबई यांच्या उपस्थितीत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *