Tuesday , September 22 2026
Breaking News

Belgaum Varta

आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक

  बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …

Read More »

अभिनेता दर्शनला बेळ्ळारी कारागृहात हलवले!

  बेळ्ळारी : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली बेंगळुरूच्या परप्पन येथील अग्रहार कारागृहात कैद असलेल्या अभिनेता दर्शन आता बेळ्ळारी कारागृहात आज गुरुवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले. अभिनेता दर्शनला तुमकूर येथून क्यातसांद्र टोलमार्गे बेळ्ळारी येथे नेण्यात आले. दरम्यान, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता …

Read More »

अभिनेता दर्शनच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसाची वाढ

  बंगळूर : बेळ्ळारी कारागृहात हलवण्यात येणार असलेला अभिनेता दर्शन याला तुरुंगात शाही पाहूणचार मिळत असल्याने चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज पुन्हा वाढवण्यात आली आहे. दर्शन हा रेणुकास्वामी हत्याकांडातील मुख्य आरोपी असून न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १३ दिवसांची वाढ केली आहे. अभिनेता दर्शनसह सर्व आरोपींना …

Read More »

मुडा घोटाळा : सिद्धरामय्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

  सुनावणीकडे सर्वांचे लक्ष्य बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात राज्यपाल थावरचंद यांच्या खटल्याला दिलेल्या मंजुरीच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या (ता. २९) पुन्हा सुनावणी सुरू करणार आहे. राज्यपालांनी १६ ऑगस्ट रोजी प्रदीप कुमार एस. पी., टी. जे. अब्राहम आणि स्नेहम यांच्या याचिकांमध्ये …

Read More »

चलवेनहट्टी येथे चौथरा बांधण्याच्या कामाचा शुभारंभ

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत अंत्यविधीचा चौथरा तसेच शेड व‌ प्रेत जाळण्याचे स्टँड उभारणीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनव्वर यांच्या हस्ते करण्यात आला. नुतन स्मशानभूमी कार्यान्वित होऊन दोन वर्षे उलटून गेली होती पण शेड तसेच स्टँड नसल्याने अतंविधिच्या वेळी ग्रामस्थांना अडचणी समाना करावा लागत होता. पावसाळ्यात ही परिस्थिती …

Read More »

खानापूरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला तरूणांनी वाचविले

  खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती …

Read More »

नौदलाची गुप्त माहिती फोडणाऱ्या तिघांना एनआयएकडून अटक

  बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला. नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर …

Read More »

बेळवट्टी विद्यालयात सत्कार, दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळवट्टी येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी संघटना, ईमारत बांधकाम कमिटी आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे अध्यक्ष विजयराव …

Read More »

खानापूर तालुक्यातील मळव गावात शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू 

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मळव या गावात शर्यतीच्या बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, मळव गावातील गणपती पारशेकर हे आपली बैले धुण्यासाठी तलावात गेले होते. रस्त्याच्या कडेला एका दगडाला बैलाला बांधून दुसऱ्या बैलाला धूत असता अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि दगडाला बांधलेला बैल उधळला …

Read More »

जिल्हाशिक्षणाधिकारी पदी लीलावती हिरेमठ यांची नियुक्ती

  बेंगळुरू : राज्य सरकारने बेळगावच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदासह विविध पदांवर नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. लीलावती शिवय्या हिरेमठ यांची बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. उपसंचालक बेंगळुरू आयुक्त कार्यालय म्हणून …

Read More »