Sunday , July 26 2026
Breaking News

लवकरच तज्ञ कमिटी व उच्चाधिकार समितीची बैठक बोलवू; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नेते श्री. जयंतराव पाटील यांचो भेट घेऊन त्यांच्याशी सीमा प्रश्नासंदर्भात व मराठी जनतेच्या अडचणी संदर्भात चर्चा केली होती. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांची एक प्रत मला द्या अशी विनंती केली होती. रविवारी या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने श्री. प्रकाश मरगाळे यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केली.
आम. जयंतराव पाटील यांनी, महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राची प्रत त्यांच्याकडे दिली आणि सर्वोच्च न्यायालयातील दावा व महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे प्रश्न अडचणी यासंदर्भात चर्चा केली लवकरात लवकर तज्ञ कमिटी व उच्चाधिकार समिती यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी आणि यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे अशी विनंती ही त्यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे चालू अधिवेशन संपताच मी बैठक बोलवितो अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. कै. श्री. दिपक दळवी यांच्या निवासस्थानी श्री. जयंतराव पाटील आले होते. त्यावेळी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना भेटले होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *