Monday , September 21 2026
Breaking News

उद्या होणाऱ्या रामनवमी निमित्त मंदिरे सज्ज

Spread the love

 

बेळगाव : उद्या गुरुवारी चैत्र शुद्ध नवमी श्री रामनवमी निमित्त बेळगाव शहर, अपनगर तसेच ग्रामीण भागातील लहान मोठ्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून आज बुधवारी सर्व मंदिर सुसज्ज करण्यात आली आहेत.
श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गेले दोन-तीन दिवस विविध श्री राम मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागातील सर्वश्रे राम मंदिरांचे साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरांना रंगबेरंगी फुले तसेच लाइटिंगची आरास करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील रामदेव गल्लीतील राम मंदिरात, केळकर बाग येथील काणे महाराज राम मंदिरात, टिळकवाडीतील समर्थ व्यायाम मंदिरात असलेल्या राम मंदिरात, शहापूर येथील राम मंदिरात, त्याचप्रमाणे वडगाव, अनगोळ येथील राम मंदिरात उद्या जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे काकड आरती, रुद्राभिषेक पूजा, जन्मोत्सवानिमित्त कीर्तन त्यानंतर महाआरती केली जाणार आहे.
उद्या दुपारी १२.३० वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार असून, पहाटे ६ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. भजन कीर्तन झाल्यानंतर श्रीराम जन्माचा कार्यक्रम पार पडणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *