Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात कृतिशील समितीने घेतली जॉईंट रजिस्ट्रारची भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव मधील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी कृतिशील मराठा समाजाच्या समितीच्यावतीने आज सहकारी संस्थेचे जॉईंट रजिस्ट्रार अधिकाऱ्याची भेट घेऊन मागणी करण्यात आली.

यासंदर्भात बोलताना कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई म्हणाले की, मराठा बँकेत 22 उमेदवारांची नोकर भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 30 मार्च निश्चित करण्यात आली आहे. मात्र, 31 मार्च रोजी असलेली महावीर जयंतीची सुट्टी प्रशासकीय कारणास्तव 30 मार्च रोजीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नोकर भरतीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना अडचणी येऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने अर्ज सादर करण्यासाठी किमान एक दिवस मुदत वाढवून देण्यात यावी त्याचप्रमाणे शक्य असल्यास पुढील पाच दिवस मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी अमित देसाई यांनी जॉईंट रजिस्ट्रार यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे नोकर भरती प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. नोकर भरती पारदर्शकरित्या होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कृतिशीलचे समन्वयक अमित देसाई यांनी सांगितले. बोलताना ते म्हणाले की, कृतिशील मराठा समाज समितीर्फे रजिस्ट्रार यांच्याकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया (परीक्षा व मुलाखती) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखित पार पाडावी. सर्व प्रक्रियेची योग्य नोंद व जतन करावे, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या देखरेखिखाली नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. संचालक, व्यवस्थापक किंवा संस्थेबाहेरील अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप रोखावा आणि गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड प्रक्रिया सुनिश्चित करण्यात यावी, अशी मागणी कृतिशील मराठा समाजाच्या समितीकडून करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *