Monday , September 21 2026
Breaking News

लाखाच्या बदल्यात म्यूल खाती; तिघा जणांवर सायबर क्राईम विभागात एफआयआर

Spread the love

 

बेळगाव : सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी म्यूल खाती उघडण्याचे लोण ग्रामीण भागातही वाढते आहे. खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचे सांगून अनेक युवकांच्या नावे बनावट खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना पाठविण्यात आली आहेत. यासंबंधी येळ्ळूर परिसरातील तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मूळचा संभाजीनगर-वडगाव व सध्या भाग्यनगर परिसरात राहणाऱ्या किरण या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून अमन निंगाप्पा पाटील (रा .सुभाष गल्ली, येळ्ळूर), पवन धामणेकर (रा. परमेश्वरनगर-येळ्ळूर), किरण पाटील (रा. सुळगा-येळ्ळूर) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किरणबरोबरच अतुल, दिनेश आदींना गाठून तुमच्या नावे बैंक खाते उघडून द्या, त्या खात्यावर आम्ही एक लाख रुपये जमा करतो, असे सांगत त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्डचे झेरॉक्स मिळविण्यात आले आहेत.

एक वर्षापूर्वी ४ मार्च २०२५ रोजी काही तरुणांना स्वतः बँकेला घेऊन जाऊन त्यांच्या नावे खाती उघडली आहेत. आणखी काही जणांच्या नावेही विविध बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. एक लाख रुपये जमा करण्याचे सांगून उघडलेली बँक खाती सायबर गुन्हेगारांना पाठविल्याची माहिती उघडकीस आली आहे. शहर सायबर क्राईम विभागात दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *