Monday , September 21 2026
Breaking News

मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्याचा अभिमान; डॉ.रोहन पाष्टे यांचे प्रतिपादन

Spread the love

 

मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. रोहन पाष्टे यांची भेट

बेळगाव : दि. 2 एप्रिल 2026 रोजी डॉ.रोहन पाष्टे यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेला भेट दिली. सुरूवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. रोहन पाष्टे यांनी अभिवादन केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, सदस्य शिवाजी अतिवाडकर, अरुण देसुरकर यांनी डॉ. रोहन पाष्टे यांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ग्रामीण भागातील भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन तैवान या देशामध्ये उच्च पदापर्यंत पोचलेल्या डॉ.रोहन पाष्टे यांचा प्रवास मुलांसाठी प्रेरणादायी आहे. शाळेतील शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धांमधून तसेच वेगवेगळ्या बौद्धिक स्पर्धांमधून भाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा विकास होतो, सामाजिकीकरण होते. भारताबाहेर तैवान या देशात पीएचडीचे शिक्षण घेतल्यानंतर आलेला अनुभव त्यांनी कथन केला. तैवानमध्ये सुद्धा मातृभाषेतूनच शिक्षण घेतले जाते, इंग्रजी शाळा क्वचितच आहेत किंबहुना त्या शोधाव्या लागतात. शिस्त, स्वच्छता, आर्थिक समानता, वक्तशीरपणा अगदी लहानसा देश असूनही ही मूल्ये पाळली जातात. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे माणसाला प्रभावीपणे आपले मत मांडण्यासाठी सोपे होते हे त्यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवातून स्पष्ट केले. हा देश सेमीकंडक्टर्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषेचे जतन करण्यासाठी घरापासून सुरुवात केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. माणसाने जास्तीत जास्त भाषा अवगत केल्या पाहिजे. एखादे काम करण्यासाठी मनाची जिद्द हवी. का ? व कसे ? हे दोन्ही प्रश्न स्वतःला विचारून ते काम पूर्णत्वाकडे नेले पाहिजे. ए.आय.चा सकारात्मकरित्या वापर करून आपण घ्यावा, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी संपूर्ण शाळेची पाहणी करून शाळेतील प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक, चित्रकला व संगीत विभाग, सुट्टी कालावधीत चालू असणाऱ्या छंद वर्गाचेही त्यांनी कौतुक केले.
शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार व सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सविता पवार यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *