Sunday , July 26 2026
Breaking News

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : डी. देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पात्र महिला लाभार्थ्यांना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

मंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात एकूण १८ लाभार्थ्यांना शिलाई मशीन देण्यात आल्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या उद्देशाने या साहित्याचे वितरण करण्यात येत असून, यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, महिला आणि बालविकास विभागाचे उपसंचालक चेतन कुमार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंत, तहसीलदार बसवराज नागरहाळ, उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *