उचगाव : आम्ही तुम्हाला शिक्षण घेऊन तब्बल 51 वर्षे होऊन गेले तरी अजून तुम्ही आम्हा शिक्षकांचे ऋण विसरला नाहीत तुम्ही आमची 51 वर्षांनतर सुद्धा आठवण करून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत. ज्ञान दिल्याने ते वृद्धिंगत होते. शिक्षकी पेशामध्ये शिक्षक अखंडपणे ज्ञानाचा झरा आहे. ज्ञान देण्याचे पवित्र काम आपल्या संपूर्ण हयातीत तो करत असतो. तुमच्यासारखी चांगली ज्ञानी पिढी घडवण्यासाठी शिक्षक सातत्याने झटत असतो. आज आपण सर्वांनी आम्हा शिक्षक वर्गाची आठवण करून स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून गुरुजनांचा जो मान-सन्मान केला हा आमच्या आयुष्यातील भाग्याचा सर्वोच्च क्षण आहे. आम्ही शिकवलेले सर्व विद्यार्थी 51 वर्षानंतर परत आम्हाला भेटले व आमची आठवण काढली आणि तुम्ही मिळवलेल्या यश हे पाहून आमचा उर भरून आलेला आहे. तुम्ही सर्वजण यापुढेही तुमच्या जीवनात यशस्वी व्हा व तुमचे जीवन सुख समृद्धीमध्ये जावो असे विचार स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या 1975 -76 या सालामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या 51 वर्षाच्या कालावधीनंतर “दि हेवन लॉन” या सभागृहात बोलताना स्वामी विवेकानंद हायस्कूलचे निवृत्ती मुख्याध्यापक पी. के. तळले सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये अध्यक्षपदावरून बोलताना काढले.
या मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक आर. आय. कोकितकर, पी. एम. टपालवाले, वाय. बी. चौगुले आदी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने त्यांना व्यासपीठावरती आणण्यात आले व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले
त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी दिवंगत शिक्षक विद्यार्थ्यांची नावे बाळू तुपारे यांनी वाचून दाखवली त्यानंतर एल डी चौगुले यांनी प्रास्ताविक करून शिक्षकांचा परिचय करून दिला व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिचय व प्रास्ताविकामध्ये बोलताना एल डी चौगुले यांनी 1975 76 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी व शाळेतील आठवणी याबद्दल व शिक्षकांच्या बद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले
त्यानंतर आर आय कोकितकर पी एम टपालवाले वाय बी चौगुले यांनी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले विचार मांडले त्यानंतर 1975 76 च्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये आपण काय करतो याबद्दल व शाळेच्या आठवणी सांगण्यात आल्या यामध्ये गंगू करडे शोभा जाधव कांचन देसाई विजया कदम अधी विद्यार्थिनीनी तसेच मनोहर कित्तूर कृष्णा तुडयेकर सुरेश राजूकर रामलिंग देसाई बाळू तुपारे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी मनोहर कदम शिवाजी खांडेकर सुरेश राजू कर गोपाळ डोंनकरी यल्लाप्पा चौगुले एल डी चौगुले गंगू करडे विजया कदम शोभा जाधव आजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लू ताई मेणसे यांनी केले व आभार शोभा जाधव यांनी मांडले
फोटो
उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या 1975 76 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात उपस्थित शिक्षक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी
Belgaum Varta Belgaum Varta