Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये अटल टिंकरिंग विज्ञान शिबिर संपन्न

Spread the love

 

 

बेळगाव : दिनांक 22 मे 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला. दरवर्षी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. यावर्षी ही शिबिराचे आयोजन 12 मे पासून 22 मे पर्यंत करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व सृजनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, नवीन कल्पना सुचविणे व त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे. नवीन तंत्रज्ञान रोबोटिक्स, बेसिक कोडींग, इलेक्ट्रॉनिक्स, तसेच 3D प्रिंटिंग अँड डिझाईनिंग यासारख्या विषयांचा समावेश होता. हँड्स ऑन लर्निंग या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतः करून बघण्याचा अनुभव मिळाला. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. पालकांचा व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या शिक्षण समन्वयक सविता पवार तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन.सी. उडकेकर, अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर आणि स्नेहा कुप्पेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *