Monday , September 21 2026
Breaking News

नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यातील बेळंकी गावचे रहिवासी तसेच नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना प्रतिष्ठेचा “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर झाला आहे. राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील बड़ी खाटू येथे अखिल भारतीय कबीर मठ यांच्या वतीने २९ जून रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख संत संत श्री नानकदासजी महाराज यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
सध्या डॉ. देसाई हे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा ट्रेनिंग कॉलेज येथे हिंदी प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत. हिंदी साहित्यावरील प्रेम, अभ्यास आणि लेखनाची जिद्द यामुळे त्यांनी नवोदित कवी म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे.
त्यांचे दस्तक… अनसुनी आहट, दहलीज… एक सीमा
हे दोन स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहांमध्ये देशप्रेम, समाजप्रबोधन, राजकारण, व्यंग्य, प्रेम आदी विविध विषयांवरील कविता समाविष्ट आहेत. त्यांच्या अनेक कविता दैनिक “स्वतंत्र वार्ता”मध्येही प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांच्या प्रभावी लेखनशैलीचा आणि हिंदी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी रवींद्रनाथ टागोर स्वदेश इंडिया ग्लोरीज संस्थेकडून त्यांना “स्वदेश भारत गौरव सन्मान २०२६” देखील जाहीर झाला आहे.
डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांनी प्राथमिक शिक्षण बेळगाव जिल्ह्यातील छोट्याशा बेळंकी गावात घेतले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथे पूर्ण केले. सध्या ते हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *