Monday , September 21 2026
Breaking News

शिवानंद निलण्णावरांकडून कार गिफ्ट घेतलेल्या करवे जिल्हाध्यक्षाला सीआयडी नोटीस

Spread the love

 

बेळगाव : अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीआयडी ताब्यात असलेल्या शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. करवे (प्रवीण शेट्टी गट) बेळगाव जिल्हाध्यक्ष अभिलाष यांना सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

शिवानंद निलण्णावर यांनी अभिलाष यांना आलिशान कार भेट दिल्याच्या माहितीच्या आधारे सीआयडीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेला कन्नड उत्सव यशस्वी झाल्यानंतर सुमारे दीड कोटी रुपये किमतीची आलिशान कार अभिलाष यांना निलण्णावर यांनी भेट दिली होती, अशी चर्चा आहे. याशिवाय अभिलाष प्रमुख भूमिकेत काम करत असलेल्या चित्रपटातही शिवानंद निलण्णावर यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.

सीआयडी चौकशीदरम्यान कार खरेदी आणि चित्रपट निर्मितीसाठी निधी दिल्याची माहिती शिवानंद यांनी दिल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर कार खरेदी आणि चित्रपट निर्मितीसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर अभिलाष यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *