Monday , September 21 2026
Breaking News

क्रूझरला ट्रकची धडक : एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

कलबुर्गी : क्रूझर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर अपघात कलबुर्गी जिल्हा येथील चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर क्रॉसजवळ, राष्ट्रीय महामार्ग १५० वर घडला. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे क्रूझर वाहनाचा चक्काचूर झाला.
या अपघातात तोलूसाब कॅश्वार (27), हुसेन शहा (48), महबूब अली (45), रसूल बी (42) आणि फातिमा अली (38) यांचा मृत्यू झाला. मृत सर्वजण चित्तापूर तालुक्यातील इंगलगी गावचे रहिवासी होते.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *