Saturday , August 22 2026
Breaking News

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वडगाव येथे रविवार, १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर

Spread the love

 

बेळगाव : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ (सोनार गल्ली, दत्त गल्ली, पटवर्धन लेआऊट, मा. वडगाव, बेळगाव) यांच्यावतीने रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संकलित केले जाणारे रक्त ‘श्री महावीर ब्लड बँक, बेळगाव’ यांच्यातर्फे संकलित (रक्त संकलन) केले जाणार आहे.
हे शिबिर रविवार, १४ जून रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत ‘श्री दत्त मंदिर, दत्त गल्ली, वडगाव, बेळगाव’ येथे संपन्न होईल.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजात पोहोचवणे आणि रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना वेळेत मदत मिळवून देणे, या सामाजिक भावनेतून मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. महावीर ब्लड बँकेचे तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रक्त संकलनाचे काम पाहणार आहेत.
वडगाव आणि परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी, विशेषतः तरुण वर्गाने या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व जय गणेश युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधव यांची मागणी

Spread the love  केसरेकर कुटुंबियांच्या पाठिशी मी ठामपणे उभा बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *