Thursday , August 20 2026
Breaking News

‘पाणी हेच जीवन’; भावी पिढीसाठी जलनियोजनाची गरज : प्रा. आनंद मेणसे

Spread the love

 

बेळगाव : पुढच्या पिढीला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे असे मत जी. एस. एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर बोलत होते. डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ, टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, दिल्ली येथील एम्स वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रख्यात शस्रक्रिया विशारद डॉ.मंजुनाथ पोळ, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
निसर्गावरील वाढते अतिक्रमण यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया मंदावत चालली आहे. जमिनीच्या पोटात असलेले पाणी कसे टिकवायचे यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. पाण्याच्या व्यापा-याचा प्रश्न मोठा असून यातील गुंतवणूक वाढत चालली असून यामुळे फार मोठा धोका संभवतो अशी भीतीही श्री. मेणसे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
यावेळी डॉ. पोळ किडणी ट्रान्सपलंट व मधूमेह शस्रक्रिया यासंबंधी सविस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन केले.
यावेळी रविंद्रनाथ जुवळी व सुरेन्द्र देसाई, यांनी हिंदी गीते सादर केली. प्रारंभी अरूण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी प्रास्ताविक केले तर विठ्ठल पोळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विजय वाईगडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *