Monday , August 17 2026
Breaking News

विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध स्पर्धा २०२६’ चे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), विश्व भारत सेवा समिती (बेळगाव), पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय (शहापूर) आणि मंथन मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध स्पर्धा २०२६-२७’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ‘पंडित नेहरू प. पू. महाविद्यालय, अळवण गल्ली, शहापूर, बेळगाव’ येथे आयोजित करण्यात आली आहे.
​मराठी विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव देणे, मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे आणि भाषा विकासासाठी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
​स्पर्धेचा सविस्तर तपशील:
​गट: माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी चे विद्यार्थी)
​दिनांक व वेळ: शनिवार दि. २० जून २०२६ सकाळी १०:०० वाजता
​स्पर्धेचा कालावधी: १ तास
​स्पर्धेचे विषय:
१) मातृभाषेचे महत्त्व
२) झाडे लावा झाडे जगवा
​उत्तेजक बक्षिसे:
​स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे:
​प्रथम क्रमांक: ₹ १,०००/- + स्मृतिचिन्ह
​द्वितीय क्रमांक: ₹ ७००/- + स्मृतिचिन्ह
​तृतीय क्रमांक: ₹ ५००/- + स्मृतिचिन्ह. ​अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:
​प्रकाश नंदिहळी (सचिव, विश्व भारत सेवा समिती): ९८८०५५२२७९
​मयूर नागेनहट्टी: ९६६३६५४५७७
​रेणुका चलवेटकर: ९४४९०७५०४४

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *