Monday , August 17 2026
Breaking News

सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्या निवेदनाची महापालिकेकडून दखल; न्यू गुड्सशेड रस्त्याची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी दिनांक 10/06/2026 रोजी माननीय आयुक्त, महानगरपालिका बेळगाव यांना निवेदन दिले होते.
संबंधित निवेदनाची दखल घेत माननीय आयुक्त महोदयांनी सोमवार, दिनांक 15/06/2026 रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांना सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठविले. पाहणीदरम्यान रस्त्याची अत्यंत खराब अवस्था निदर्शनास आली असून, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी महानगरपालिका प्रशासनाने केवळ आश्वासन न देता या प्रश्नाकडे महत्त्वाच्या सार्वजनिक समस्येच्या दृष्टीने पाहावे, अशी मागणी केली. तसेच पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी विनंती करण्यात आली.
या रस्त्याचा वापर दररोज हजारो नागरिक, रुग्णवाहिका, शालेय वाहने व इतर वाहनचालक करत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *