मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे विद्यमान एसडीएमसी अध्यक्ष, श्री बालशिवाजी वाचनालयाचे माजी अध्यक्ष तसेच उद्योजक व समाजहितैषी व्यक्तिमत्त्व श्री. गजानन छप्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना फुटबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन संच तसेच इतर विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी क्रीडा साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
श्री. गजानन छप्रे हे विविध उद्योग यशस्वीपणे सांभाळत असतानाच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने योगदान देत आहेत. वाढदिवसानिमित्त शाळेला क्रीडा साहित्य भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, एसडीएमसी सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या वतीने श्री. गजानन छप्रे यांचा शब्दशः सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta