Monday , August 17 2026
Breaking News

प्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; त्रिशूळ वितरण आणि शस्त्रप्रदर्शनाचा आरोप

Spread the love

 

हुबळी : द्वेषपूर्ण भाषण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य उल्लंघनाच्या आरोपांप्रकरणी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध हुबळी उपनगर पोलिस ठाण्यात पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, हुबळीतील आर. एन. शेट्टी कल्याण मंडप येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान लोखंडी शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले तसेच महिलांना त्रिशूळाच्या आकाराची शस्त्रे वितरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

हा कार्यक्रम श्रीराम सेनेच्या महिला आघाडी ‘दुर्गा सेना’तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती आणि विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हुबळी उपनगर पोलिसांकडून सुरू असून, तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *