Monday , August 17 2026
Breaking News

वीर सौध योगा केंद्राचा आठवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्राचा आठवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे उपस्थित होते.
प्रारंभी धन्वंतरी फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. उषा दळवी यांच्या हस्ते अग्नी होत्र करण्यात आले.
आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योग महत्वाचा आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी नियमित योगासने प्राणायाम करावा. हा संदेश प्रत्यक्षात लोकांना कळायला हवा त्यासाठी योग शिक्षक गोपाळ देशपांडे यांनी वीर सौध योगा केंद्र टिळकवाडी येथे सुरू केले.
गेल्या आठ वर्षांपासून नियमितपणे हा योग वर्ग सुरू आहे त्याचा लाभ अनेक पुरुष व महिला घेत आहेत. नियमित योगासने प्राणायाम ध्यान केल्याने आरोग्य सुदृढ व निरोगी आहे, अशी प्रतिक्रिया आपल्या मनोगतात उपस्थित साधकांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केली.
यावेळी गोपाळ देशपांडे, उमेश सुपाले, रवींद्र सुतार, प्रा.अमरनाथ, तसेच उषा दळवी, सौ. गीता देशपांडे, शोभा दुर्वे, दीपा चौगले, बीना मुन्नोळकर, स्मीता निंबाळकर, वर्षा शानबाग, सुलक्षणा जाधव, पल्लवी मदली, विजयालक्ष्मी मायकलवार, प्रा. भूदेवी पुरोहित, जुबेजा आगा, श्रीमती गायतोंडे आदी सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाय पी नाईक यांनी केले.
आभार दत्तात्रय कुरविनकोप यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *