Wednesday , August 19 2026
Breaking News

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या आई-वडिलांची मान खाली झुकणार नाही असेच वागा, जीवनात आत्मविश्वास, शिस्त, चांगला एटीट्यूड आणि एकाग्रता महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गुरुनिष्ठा, चांगली संगतही महत्त्वाची आहे” असे विचार सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्ष प्रा स्वरूपा इनामदार यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि कै. बी के बांडगी शैक्षणिक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमिक शाळामधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा स्वरूपा इनामदार प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या आणि पाहुणे म्हणून प्रकाश कडोलकर हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप भेकणे हे होते तर व्यासपीठावर बांडगी ट्रस्टचे रघुनाथ बांडगी, मंदिराचे उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी व सचिव अनंत लाड हे उपस्थित होते.

बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमधून प्रथम आलेल्या २५हून अधिक विद्यार्थिनींना प्रत्येकी पंधराशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, वह्या आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात व उपस्थितांचे स्वागत सौ मनस्वी केदार बांडगी यांनी केले, पाहुणे व ट्रस्टीज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर हनुमान फोटोचे पूजन रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रकाश कडोलकर यांनी स्वर्गीय बी. के. बांडगी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पाहुण्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी काकडे फाउंडेशनचे किशोर काकडे यांनी विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावशाली भाषनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलेल्या स्वरूपा इनामदार पुढे म्हणाल्या की, “ज्या मारुती मंदिरात तुमचा सन्मान होतोय तो मारुती हा पराक्रमी योद्धा होता तो संस्कृतचा गाडा अभ्यासक होता त्याच्यापासून प्रेरणा घेऊन जीवन उज्वल करा. त्यासाठी मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचा, जीवनात जी जी माणसे यशस्वी झाली आहेत त्या पाठीमागे त्यांचा प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम कारणीभूत आहेत. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यामुळे जीवनात नम्रता, उत्तम चरित्र, प्रामाणिकपणा, विश्वास आणि सतर्कपणा या गोष्टी आत्मसात करा म्हणजे आपले जीवन उज्वल होईल” असे त्या म्हणाल्या
प्रारंभी सचिव अनंत लाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन नेताजी जाधव यांनी केले. कार्यक्रमास बाबुराव पाटील, चंद्रकांत बांडगी, संभाजी चव्हाण, सुनील सरनोबत या ट्रस्टीजसह रमेश कुकडोळकर, प्रभाकर पाटील, मनोहर कुकडोळकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी मराठा मंडळमध्ये नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *