
बेळगाव : येळ्ळूर हणमंतगौड नगर येथील नागरिकांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे हणमंतगौड नगर येथील लाईटची समस्या मांडून प्रत्यक्षात निदर्शनाला आणून दिली होती. सतीश पाटील यांनी त्वरित हेस्कॉम अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून, कागदपत्रांची पूर्तता करून कामाला मंजुरी घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून उमेश पाटील यांच्या घरापर्यंत के. ई. बी. चे सात सिमेंट खांब घालून स्ट्रीट लाईटचे काम व सर्व खांबावरती लाईट लाऊन स्थानिक नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर केली. यापूर्वी सुद्धा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कामाची सुरवात केली होती व उर्वरित कामाची आता पूर्तता केली या बद्दल माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांचे स्थानिक नागरिक व गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


Belgaum Varta Belgaum Varta