Tuesday , August 25 2026
Breaking News

छत्रपती शहाजी महाराज समाधीस्थळ विकासासाठी श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज नेते किरण जाधव यांच्यात चर्चा

Spread the love

 

भाजप नेते किरण जाधव यांचे प्रमोदजी मुतालिक यांच्याकडून कौतुक
बेळगाव : श्रीराम सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. प्रमोदजी मुतालिक यांनी सकल मराठा समाज व भाजपचे नेते श्री. किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान होदगीरे (औदीगिरी) येथील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच बेळगावातील सकल मराठा समाजाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

बैठकीदरम्यान बेळगावमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध सामाजिक व संघटनात्मक कामांबद्दल श्री. प्रमोदजी मुतालिक यांनी विशेष समाधान व्यक्त केले व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
होदगीरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे विकासकाम गेल्या काही काळापासून रखडलेले आहे. बेळगावच्या सकल मराठा समाजाने काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भेट देऊन शासन दरबारी या ऐतिहासिक जागेच्या विकासासाठी मागणी केली होती.
याच अनुषंगाने, आगामी काळात या समाधीस्थळाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज एकत्रितपणे शासन दरबारी तीव्र मागणी व पाठपुरावा करण्या बाबत या बैठकीत चर्चा झाली .
बेळगावात किरण जाधव आणि सकल मराठा समाज अत्यंत कौतुकास्पद काम करत आहे. छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास हा आपल्या अस्मितेचा विषय असून, यासाठी आम्ही एकत्र येऊन सरकारकडे ताकदीने मागणी मांडू.”असे श्री राम सेने चे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी अशा व्यक्त केली
या बैठकीप्रसंगी श्रीराम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच किरण जाधव व सकल मराठा समाजाचे काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Spread the love  बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *