Monday , September 21 2026
Breaking News

सीमाप्रश्नी पुणे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली आम. शशिकांत शिंदे यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चाललेल्या लढ्यात खानापूर बेळगाव येथून पुणे येथे स्थायिक झालेल्या युवक व नागरिकांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात गणपती पाटील,विश्वनाथ पाखरे ,वैराळ सुळकर, मारुती पाटील उपस्थित होते. ही भेट घडवून आणण्यासाठी जावळी कृषी उत्पन्न समितीचे उपाध्यक्ष श्री.हेमंत हिंदुराव शिंदे यांचे सहकार्य लाभले.

या भेटी प्रसंगी विश्वनाथ पाखरे यांनी सीमाभागात होणारी मराठी भाषेची गळचेपी,मराठी भाषिकांवर होणारे भाषिक अत्याचार,दाखल होणारे खोटे गुन्हे,कन्नडसक्ती व प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्ना संदर्भात माहिती दिली.

यावेळी शिष्टमंडळाला आश्वासन देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न गेली ७० वर्षे प्रलंबित असून सीमाप्रश्न हा सिमावासीयांच्या अस्मितेचा आहे, मुळात हा प्रश्न महाराष्ट्राचा असून आज पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तो गांभीर्याने न घेतल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी महाराष्ट्रातच याचा मोठा उठाव झाला पाहिजे व महाराष्ट्रासह केंद्रसरकारवरही दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण पुणेस्थित सीमावासीय जो लढा या प्रश्नांसंदर्भात उभाराल त्याला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करून निकराची लढाई लढण्यासाठी पक्षभेद विसरून या लढ्याला विशाल स्वरूप देऊया व सीमाप्रश्न सोडवून घेऊया असे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *