Sunday , September 20 2026
Breaking News

शेतातील रस्ते त्वरित दुरूस्त करा; येळ्ळूर म. ए. समितीचे निवेदन सादर

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर शिवारातील रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या शेतीतील कामे जोमात सुरू आहेत. तरी पी डी ओ नी त्वरित लक्ष घालून सदर रस्ते दुरूस्त करून बळीराजाचा दुवा घ्यावा.
त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उदाहरणार्थ गोडी विहीर, माणग्याची विहीर, बाराभाव विहीर इंदिरा नगर येथील विहिरीत ब्लिचिंग पावडर घालणे आवश्यक आहे. गावातील लक्ष्मी तलाव, फुटूक तलाव, आणि मंगाई तलावात पावसाचे पाणी वळवून पाण्याचा साठा करावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी साफ कराव्यात आणि डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि शिवाजी विद्यालयसमोरील जीर्ण झालेला वृक्ष त्वरित हलवावा आणि संभाव्य धोका टाळावा. अशा आशयाचे निवेदन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ग्रामपंचायतीचे सचिव सदानंद मराठे यांना देण्यात आले.
यावेळी येळ्ळूर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेंद्र पाखरे, सुरज गोरल, यलुपा पाटील, शिवाजी कदम, शिवाजी पाटील, रमेश धामणेकर, नेताजी गोरल, सतीश देसूरकर, बाळकृष्ण पाटील, प्रकाश सायनेकर, शिवाजी गोरल, कृष्णा शहापूरकर, भरमाण्णा मंगणाकर, भुजंग संभाजीचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *