Monday , August 17 2026
Breaking News

मारिहाळ पोलिसांची गांजा विक्रीवर धाड; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची विक्री करणाऱ्या एका युवकावर कारवाई करून त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १३ हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुच्छंडी गावातील भारत गल्ली येथील रहिवासी प्रकाश अर्जुन बंगारी (वय २१) हा मुचंडी–बुडानूर रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडून २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९/२०२६ नोंद करण्यात आला असून, त्याच्यावर अंमली पदार्थ व मन:प्रभावी द्रव्ये (एनडीपीएस) कायदा कलम २०(ब)(ii)(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मारिहाळ पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *