Monday , August 17 2026
Breaking News

बेळगुंदी, बिजगर्णी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, सरकारी मराठी प्राथमिक शाळा बेळगुंदी आणि बिजगर्णी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो.
यावेळी बोलताना, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, जर मराठी शाळा टिकल्या, तरच मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मराठी शाळांना बळकटी देण्यासाठी आणि त्यांना टिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समितीच्या वतीने गेली नऊ वर्षे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. दरवर्षी तब्बल तीनशे शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो.
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन मध्ये झालेल्या कार्यक्रमास बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक राजू मुजावर, पुंडलिक सुतार, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, गोविंद गावडे, सुषमा सुतार, कल्याणी गावडे यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बेळगुंदी मराठी प्राथमिक शाळेमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम कमिटीचे अध्यक्ष किरण मोटनकर होते. किरण मोटनकर यांनी युवा समितीच्या या स्तुत्य कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका एम.बी. नागन्नावर, सहशिक्षक श्री बेल्लारी, सहशिक्षिका बेबीताई झंगरूचे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, तसेच पदाधिकारी निखिल देसाई, युवराज सुतार, रामा अमरोळकर, शुभम कुन्नुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *