Sunday , August 23 2026
Breaking News

श्रावणभक्तीचा जागर! वैजनाथ मंदिरात कुद्रेमानीच्या भाविकांचा सामूहिक प्रसाद

Spread the love

 

कुद्रेमानी : श्रावणमास म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शिवआराधनेचा पवित्र महिना. याच श्रावणमासाच्या प्रारंभानिमित्त देवरवाडी येथील प्राचीन वैजनाथ मंदिरात कुद्रेमानीच्या भाविकांच्या वतीने सामूहिक प्रसादाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कुद्रेमानीहून आषाढी वारीला देवदर्शनासाठी गेलेले रवी पाटील, सुरेश पाटील, बाळू कदम, धोंडिबा पाटील, शिवाजी महादेव गुरव, नाना पाटील, जोतिबा मा. बडसकर, गावडू पाटील महाराज, महादेव पाऊसकर, महादेव मराठे, परशराम काकतकर, गोमाणा सुतार, संजय भीमराव पाटील, म्हात्रू काकतकर, संतोष पाटील व जोतिबा मारुती धामणेकर यांनी आषाढी वारीत देवदर्शन घेतल्यानंतर श्रावणमासाच्या प्रारंभाचे औचित्य साधून आपल्या सर्वांच्या वतीने वैजनाथ मंदिरात सामूहिक प्रसादाचे आयोजन केले.

या प्रसादाचा सुमारे शंभरहून अधिक भाविक भक्तांनी श्रद्धेने लाभ घेतला. वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पंचक्रोशीतील भाविकांमुळे परिसर भक्तिरसाने भारून गेला होता.

श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविकांकडून वैजनाथ मंदिरात दर्शन घेऊन सामूहिक प्रसाद घेण्याची परंपरा आहे. आषाढी वारीतून मिळालेली भक्तीची ऊर्जा आणि श्रावणमासातील शिवभक्ती यांचा सुंदर संगम या प्रसादाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.
यावेळी या भक्तिमय कार्यक्रमाला अरुण देवण, दीपक पाटील, विनायक नारायण पाटील, विठ्ठल मल्लू पाटील, शंकर पाटील, वैजू कागणकर, पिंटू कागणकर, बबन गुरव, माणिक गोवेकर सर, शांताराम गुरव, रघुनाथ पाटील सर, गणपती गुरव, शटुप्पा निंगाप्पा राजगोळकर, परशराम बाबू पाटील, रविंद्र बडसकर, यल्लाप्पा ग. गुरव, शिवाजी यल्लाप्पा गुरव, गणपत बडसकर, रामूगावडा पाटील, मनोहर लोहार, परशराम बिजगर्णीकर, विष्णू गुरव, विनोद व्यंकू पाटील, शंकर तुर्केवाडीकर, आप्पु चौगुले, नारायण पाटील, मधु पन्हाळकर, पुंडलिक राजगोळकर, सिद्धाप्पा शंकर पाऊसकर, हणमंत पन्हाळकर, शिवाजी मारुती गुरव यांच्यासह कुद्रेमानी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्तीची वाट आषाढीतून श्रावणात आली…
वैजनाथाच्या चरणी श्रद्धेची ज्योत तेवत राहिली!

अशा भक्तिमय आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा हा सामूहिक प्रसादाचा कार्यक्रम आनंदात, उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

मृत व्यक्तीच्या बनावट स्वाक्षरीने ७२ गुंठे जमीन विकल्याचा आरोप; एकाला अटक

Spread the love  बेळगाव : जमीन मालकाचा तब्बल ६० वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतानाही त्याच्या बनावट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *