Sunday , September 20 2026
Breaking News

आरटीओ चलनाच्या नावाने ‘एपीके’ फाईल; तरुणाच्या खात्यातून पावणेपाच लाखांवर डल्ला

Spread the love

 

 

चिकोडीतील प्रकार; व्हॉट्सॲपवर आलेल्या फाईलवर क्लिक करणे पडले महागात

चिकोडी : आरटीओ चलनाच्या नावाखाली मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवून बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचा सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा समोर आला आहे. चिकोडी येथील एका युवकाच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ८३ हजार रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चिकोडी येथील युवकाच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरटीओ चलनासंदर्भातील असल्याचे भासवणारी एक ‘एपीके’ फाईल पाठविण्यात आली होती. ही फाईल उघडून त्यावर क्लिक करताच सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईल व बँक खात्याची माहिती मिळविल्याचा संशय आहे. त्यानंतर काही वेळातच युवकाच्या कॅनरा बँकेतील खात्यातून एकापाठोपाठ ऑनलाइन व्यवहार करून मोठी रक्कम काढण्यात आली.

आपल्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होत असल्याचे लक्षात येताच युवकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. आरटीओ चलन, कुरिअर, वीजबिल, बँक केवायसी अशा विविध कारणांचा आधार घेत मोबाईलवर संशयास्पद लिंक अथवा ‘एपीके’ फाईल पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे.

सायबर गुन्ह्यांबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत असतानाही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनधिकृत ‘एपीके’ फाईल, लिंक किंवा संदेशावर क्लिक करू नये. कोणतीही फाईल डाउनलोड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि बँक खात्याची माहिती, ओटीपी अथवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *