Friday , October 23 2026
Breaking News

उसाला ५ हजार ५०० रुपये दर मिळालेच पाहिजेत

Spread the love

 

रयत संघटना कार्याध्यक्ष राजू पोवार; हत्तरगी -हुबळी पदयात्रेला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : उसाला प्रति टन ५ हजार ५०० रुपये दर आणि साखरेच्या किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ मिळावी. यासाठी आंदोलने केली आहेत. तरीही शासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने हत्तरगी ते हुबळी पदयात्रा काढूनकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ही पदयात्रा हात्तरगी येथून सुरू झाली असून बेळगाव जवळील मुक्तीमठापासून सर्व शेतकरी एकत्रित मिळून हुबळी पर्यंत जाणार आहेत. त्यामध्ये बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे.
मुखत्ती मठ येथे संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांचा शेतकरी मेळावा होणार आहे. तिथून पुढे ही पदयात्रा हुबळीच्या दिशेने रवाना होणार आहे. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागासह निपाणी तालुक्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात एकवटले आहेत. केंद्र सरकार आणि साखर कारखानदार उसाला योग्य भाव देत नाहीत,तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
शेतकरी संघटना थेट केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील घराला टाळे ठोकण्यासाठी जात असल्याने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आले आहे. हत्तरगी आणि हिरेबागेवाडी परिसरात आधीच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आता हुबळी येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *