बेळगाव : येत्या 13 जून रोजी होणार्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले.
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी पक्ष नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे त्यांनी आपले अर्ज सादर केले.
यावेळी त्यांच्यासमवेत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी व ईश्वर खंड्रे, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी तसेच काँग्रेस नेते उपस्थित होते.
