Tuesday , June 2 2026
Breaking News

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पवन, धनंजय, श्रेयन, दक्षण, एस. मीनाक्षी मेनन विजेतेपदाचे मानकरी

Spread the love

बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटना व एनरआरजी केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध प्रकारात जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच एकूण 46 प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ निवृत्त आय. पी. एस. अधिकारी गोपाळ होसुर, पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगया, डॉ. विवेक सवोजी, रक्षित जगदाळे, डॉ. व्ही. ए. कोठीवाले, सतीश कुमार, रवींद्र खोत, सुधीर कुसाने, उमेश कलघटगी या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पहिल्या दिवशी पंधराशे मीटर फ्री स्टाइल मुलामध्ये दक्षण बसवणागुडी एक्वेटिक साबा सुहासने ग्लोबल स्विम सेंटर ग्लोबल यांनी विजेतेपद पटकाविले.

यावेळी पंधराशे मीटर पुरुष फ्रीस्टाइल प्रकारात पवन धनंजय अमोघ आनंद निलेशदास डॉल्फिन एक्वेटिक यांनी यश संपादन केले तर मुलींमध्ये सेरिन बसवणगुडी रितिका बसवणगुडी आदित्य बसवनगुडी यांनी घवघवीत यश संपादन केले.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *