बेळगाव : आज बेळगांव (सांबरा) एअरपोर्ट मुख्य प्रतिक्षालयमध्ये आर्टिस्ट शिरीष देशपांडे (बेळगांव) यांनी बॉलपेनने साकारलेली श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांची प्रतिमा व माहिती पोस्टरचे अनावरण उत्साहात पार पडले. बेळगांव एअरपोर्ट अथॉरिटीचे मुख्य प्रवर्तक श्री. राजेश मौर्य, श्रीदत्त संस्थान ट्रस्टी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, सौ. उज्वला व श्री शिरीष देशपांडे, उद्योजक भरत देशपांडे बेळगांव यांच्या शुभहस्ते श्री प्रतिमेचे अनावरण झाले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर सामूहिक आरती झाली व प्रसादाचे वाटप झाले. प्रकाश जोशी यांनी पंतसंप्रदायची माहिती कन्नड व हिंदी भाषेत सर्वांना करून दिली.
दत्त संस्थानच्यावतीने डॉ. संजय पंत यांच्या हस्ते एअरपोर्ट चिफ श्री। राजेश जी मौर्य यांचा पंतप्रतीमा, शाल, श्रीफळ अर्पण करून, आदर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विमानतळावरील विविध विभागाचे स्टाफ, सुरक्षारक्षक, एयर होस्टेस, कस्टम विभाग कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थांमार्फत सुधाकर खोत, श्री. प्रकाश जोशी, बाबासाहेब सुतार, अवधुत व वैभव सायनाक, राजू किल्लेकर इत्यादी मंडळी उपस्थित होती. तीस मिनिटे विमानतळ परवाना असताना तीन तास वेळ आत कसा गेला समजलेच नाही. सारे या वातावरणात रमबाण झाले होते.
