Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा : किरण जाधव

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील आरमने मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव यांनी केले आहे.
कर्नाटक राज्य मराठा समाज अभिवृद्धी निगम प्रारंभोत्सव कार्यक्रम आरमने मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे होणार असून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मराठा समाजाचा समावेश 2 बी मध्ये करावा अशी मराठा समाजाची मागणी आहे. याशिवाय मराठा समाजाच्या उन्नतीसाठी कर्नाटक मराठा समाज अभिरुद्धी निगमच्या व्यासपीठावर प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही किरण जाधव यांनी म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *