Sunday , July 26 2026
Breaking News

जिथे संस्कार तिथे संस्कृती : आपटे

Spread the love

गणेशपूर संत मीरा शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

बेळगाव : जिथे संस्कार असतात, तिथे संस्कृती नांदत असते. प्रगती होत असते. जिथे विकृती असते तेथे अधोगती असते. जीवनात अनेक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरु भेटत असतात. आपले आईवडील पहिले गुरु असतात, असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांनी व्यक्त केले.
गणेशपूर येथील संत मीरा शाळेत दि. 13 रोजी गुरुपौर्णिमा आणि हडपद अप्पण्णा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपटे बोलत होते. यावेळी भैरू पाटील, विलास तहसीलदार, विष्णू बांगडे, भाऊराव गडकरी, सौ. रेणुका उसुलकर, प्रकाश बेळगुंदकर, सौ. जयश्री कदम आणि अशोक मगदूम पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊराव गडकरी, सौ. उसुलकर, प्रकाश बेळगुंदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त समंता जारीहाळ, वीर झंगरूचे, सुस्मिता तरळे, नंदन शिंदे, श्रेया चौधरी यांनी भाषण केले. विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांची तर मुलांनीही आपल्या पालकांचीही पाद्यपूजा केली.
दुपारच्या सत्रात शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेची पूजा केली. शिक्षकांनी हडपद अप्पण्णांबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाला शाळा सुधारणा समिती अध्यक्ष देविप्रसाद कुलकर्णी, महेश नरगुंदकर, विनायक ग्रामोपाध्ये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता गणिगेर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *