Sunday , July 26 2026
Breaking News

वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर भागात गटारीचे पाणी घरात

Spread the love

 

बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर परिसरात गटारी नसल्यामुळे तसेच गटाराची सफाई केली नसल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील घरामध्ये शिरले आहे. आनंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी फोटो आणि व्हिडीओमार्फत येथील परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आनंदनगर, संभाजीनगर अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर आदी भागातील नागरिकांनी वेळोवेळी ही समस्या स्थानिक लोकप्रतिनिधीना निदर्शनास आणून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्यापूर्वी या भागातील नागरिक लोकप्रतिनिधींकडे आपली समस्या मांडतात मात्र लोकप्रतिनिधी आश्वासन देऊन या भागातील नागरिकांची बोळवण करतात. देशात अव्वल आलेली स्मार्टसिटी खरोखर स्मार्ट होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *