बेळगाव : क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा व उत्कृष्ट संयोजन अशा पहिल्याच स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
देशा बाहेरचे व अंतर्गत शत्रू स्प्लीट-हिंदुस्थान म्हणजे देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्नात असतांना बेळगावच्या आठ युवा-मंडळीनी क्लिक-वेणुग्राम हा बेळगावसह देश जोडण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्तुती करण्यात आली. मेक ईन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारखाच सदर उपक्रम आहे. आता कोणतेही सरकार नोकर्या देणार नाही. यासाठी युवावर्गानी असे व्यवसाय सुरु करावेत. आपण हिंदु आहोत, नामदेव शिंपी आहोत, संत नामदेवानी विठ्ठल मंदिराच्या पायरीत बलीदान केले, तसेच आपण समाजकार्य करुया. कारण ”मैं रहूँ या ना रहूँ भारत ये रहना चाहीए” हा विचार महत्वाचा. भक्ती-परंपरा- देखावासह सामाजिक जाणीव, वुहान कोरोनाचा घातक परिणाम या संकटातून संधी शोधण्यासाठी प्रयत्न करुयात, असे विचार प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडेंनी व्यक्त केले.
शहापूर येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिराच्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज भवनात रविवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी, कोविड नियमांचे पालन करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
व्यासपीठावर उपस्थित किशोर काकडेंसह अक्षय सार्वमत दिवाळी अंकाचे संपादक श्री. विलास बेळगावकर, युवा नेते व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे विभाग प्रमुख श्री. अंकुश केसरकर, सुप्रसिद्ध मूर्तिकार जे. जे. पाटलांचे सुपुत्र श्री. विश्वनाथ पाटील, युवा मूर्तिकार श्री. राजू मोहिते यांचा शाल-श्रीफळ-पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.
अंकुश केसरकरांनी युवापिढीला या स्पर्धांसह स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन केले तर विलास बेळगावकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले व क्लिक वेणुग्रामला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी मंदिरातील देवांची तसेच श्री गणपती व छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तिंची पूजा करण्यात आली. सर्वश्री सुनील मोरे, चेतन शिंदे, रोहन कुंभार, कपिल शिंदे, रणजित कुंभार, सतीश हावळ, कुमार वत्सल हावळ, प्रवीण तोगले, भानुदास झांबरे, सोमनाथ अंबरशेट, कपिल कामण्णाचे आदिनी विशेष परिश्रम घेतले.
श्री. सतीश हावळ यांनी सूत्रसंचालन तर रोहन कुंभार यांनी क्लिक वेणुग्रामबद्दल माहिती दिली. तर सुनील मोरेंनी आभार मानले. राष्ट्रगीतांनी याची सांगता झाली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
(उत्कृष्ट श्रीमूर्ती) क्रमांक 1 शिवम हूलजी, क्रमांक 2 सुमित हुद्दार, क्रमांक 3 किरण कोलते.
(उत्कृष्ट देखावा) क्रमांक 1 वैभव बडमंजी, क्रमांक 2 नाईक आणि बंधू, क्रमांक 3 भूषण चौगुले.
(उत्तेजनार्थ) क्रमांक 1 सर्वेश भरमुचे, क्रमांक 2 जितेश नाईक, क्रमांक 3 वैभव भोपळे.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …