Monday , April 20 2026
Breaking News

मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह दाम्पत्य जखमी

Spread the love

 

मन्नुर येथील घटना, समिती नेते आर. एम. चौगुले यांची कार्यतत्परता

बेळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह एक दाम्पत्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी मन्नुर (ता.जि. बेळगांव) येथे घडली आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सायकलस्वारा वृद्धाचे नाव बसवंत महादेव पाटील असल्याचे समजते.

बसवंत हे आज सकाळी सायकलवरून कामानिमित्त बेळगावकडे निघाले होते. त्यावेळी आंबेवाडी क्रॉस ब्रिजनजीक मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर बसवंत हे बेशुद्ध पडले. याबाबतची माहिती मिळताच आंबेवाडी गावातील युवकांनी धाव घेतली.
बेशुद्ध बसवंत यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागविली होती, मात्र त्याचदरम्यान म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले त्या ठिकाणी दाखल झाले व रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता स्वतःच्या वाहनातून तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सायंकाळी याच रस्त्यावरून जाणाऱ्या एक दाम्पत्यावर देखील मधमाश्यानी हल्ला चढविला आहे. यामध्ये दाम्पत्य देखील जखमी झाले असून त्यांच्यावर देखील खाजगी इस्पितळात उपचार चालू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *