Saturday , June 6 2026
Breaking News

बेळगावात अफीमची तस्करी करणाऱ्या दोन राजस्थानी युवकांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात अफीमची तस्करी करणाऱ्या दोन राजस्थानी युवकांना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या जवळील जवळपास दोन लाख 70 हजाराचे अफीम आणि इतर सामुग्री जप्त केली आहे.
रोहिताश बिष्णोई वय 24 मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार एम. के. हुबळी आणि राजकुमार बिष्णोई मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार रुक्मिणी नगर बेळगाव अशी अटक केलेल्या दोघा युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर रोजी शहर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑटोनगर टाटा पॉवर प्लांटजवळ संशयास्पदरित्या फिरत अफीमची विक्री तस्करी करणाऱ्या या दोघांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्या जवळील दोन लाख 70 हजार किंमतीचे 325 ग्रॅम वजनाचे अफीम एक स्विफ्ट कार दोन मोबाईल तीन हजार रुपये रोख रक्कम जप्त केला आहे. या प्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे.
कारवाई भाग घेतलेल्या शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आणि सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

संध्या सुरक्षा योजनेत मोठा गैरप्रकार; अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा अव्वल

Spread the love  बेळगाव : वृद्धांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *