Sunday , July 26 2026
Breaking News

बायपासमधील शेतकऱ्यांचाही मोर्चाला पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : सरकारने विकासाच्या नावे शेतकरीच संपवायचा विडाच उचलल्याने आता संपूर्ण कर्नाटकातील शेतकरी सुपीक जमीनीतून बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड, हलगा येथील सांडपाणी प्रकल्प, बुडाचे अतिक्रमण, मोठमोठे प्रकल्प उभारणे त्याचबरोबर ऊसदर प्रश्नी मोठा विरोध तसेच आंदोलनं सुरु आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहेत.
त्याचाच भाग म्हणून बेळगाव भोवताली पीकाऊ जमीनीतून सरकारने रिंगरोड करण्याचा घाट घातला आहे त्याला 30/32 गावातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र एकीकरण समीती तसेच इतर संघटनांच्या माध्यमांच्या पाठिंब्याने कारण शेतकऱ्यांना जातपात, भाषाभेद, पक्षभेद नसतोच. त्याची जात एकच ती म्हणजे शेतकरी. त्यासाठी येत्या सोमवार दि. 28/11/2022 रोजी सकाळी रिंगरोड विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, बैलगाड्या, जनावरं, आपल्या संपूर्ण कुंटूबांसहित मोर्चा चे आयोजन केले आहे. त्या मोर्चाला हालगा-मच्छे बायपासमधील तसेच शहरी भागातील समस्त शेतकरी बंधूचाही मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी गुरुवार दि. 24/11/2022 रोजी रात्री वडगावमधील श्री ज्ञानेश्वर मंदीरात रयत संघटना व इतर शेतकरी संघटनांतील शेतकऱ्यांची बैठक झाली त्यामधे रिंगरोड विराधातील मोर्चाला खंबिर पाठिंबा देत मोठ्या संखेने मोर्चात सहभाग दर्शवत त्यामधे रिंगरोड तसेच हालगा-मच्छे बायपासही रद्द व्हावा व म.ए. समीतीने ठरवून दिलेल्या घोषणां देत शांततेत मोर्चा यशस्वी करुन सरकारला जागे करत शेतकरी जगला तर देश आणी राज्यातील जनता जगेल याची जाणीव करुन द्यावी.
यावेळी राजू मरवे, अनिल अनगोळकर, सुभाष चौगले, रमाकांत बाळेकुंद्री, हणमंत बाळेकुंद्री, महादेव पाटील, महेश चतूर,भैरु कंग्राळकर, नितिन पैलवानाचे, गूंडू भागाणाचे, गोपाळ सोमणाचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *